Tuesday, June 15, 2010

Henpecked Life....


This post is actually a विडंबन काव्य.. Which means a SPOOF. Its a take on the sufferings of a Hen-Pecked husband... This has to be sung in the tune of a very famous Old Marathi Song 'देहाची तिजोरी', which was composed by great Shri. Sudhir Phadke or 'Babuji' as he is known fondly... The spoof was coined by Yashwant Dev who himself is a renowned composer in Marathi Music... 


पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा
मरण धाड देवा आता, मरण धाड देवा   11 धृ 11

सकाळी चहाच्या वेळी, दुखे हिची पाठ
बिछान्यात पडल्या पडल्या जांभई विराट
हिची एक इच्छा हाती झाडू मी धरावा 
मरण धाड देवा आता, मरण धाड देवा  - १

सदा मैत्रिणीचा घोळ, गप्पा आणि खाणे
पर्स घेउनी मौजेने मार्केटिंगला जाणे
स्वामी असुनी मी घराचा दास का ठरावा?
मरण धाड देवा आता, मरण धाड देवा  - २

काल हिने केली पूजा, अंगणी वडाची...
सात जन्म निश्चित झाली, कैद ह्या जीवाची.
माझ्या दुर्भाग्याचा अजूनही हवा का पुरावा?
मरण धाड देवा आता, मरण धाड देवा - ३

No comments: