Tuesday, June 7, 2011

Nightmare


आजच्या महाराष्ट्रातील घडामोडींचा विचार करून, एका त्रस्त मुंबईकराच्या द्र्ष्टीकोनातून, तो काय विचार करत असावा ह्याचा आढावा म्हणजेच ही कविता होय. लाच खाणाऱ्या नेत्यांमुळेच मुंबईत वाढत चाललेले उत्तर भारतीयांचे लोंढे आणि त्या मुळे झालेली मुंबई शहराची दयनीय अवस्था उघड्या डोळ्याने बघत राहण्या खेरीज सामान्य मुंबईकरांकडे दुसरा काही इलाज नाही. मुंबई ही आता मराठी माणसाची राहिलेलीच नाही ह्याच्या पेक्षा मोठं दू:स्वप्न ते काय? ह्याच विषयावर सुचलेली एक कविता!

NIGHTMARE

आसुसलेल्या लोचनांनी,
 उतरलो मी 'V.T.' ला 
एकही मराठी चेहरा,
 नाही दिसला भेटीला - || १ ||

सहज वरती नजर फिरली, 
पहिले त्या पाटीला
'लालू यादव टेसन' बघुनी 
घाव झाला छातीला - || २ ||

संताप डोक्यात होता, 
पाहिले चहू बाजूला 
मराठी धरतीवरी ह्या, 
'भैय्या' होता माजला - || ३ ||

रम्य जीवन नष्ट झाले, 
काहीच मज ना कळे
मायेचे ते हाल बघता, 
रक्त माझे सळसळे - || ४ || 

होती 'देवनागरी' तरी, 
नव्हती ती संस्कृती
रद्दीतल्या 'महाराजांची' 
खिन्न होती आकृती - || ५ || 

सांडूनी रक्ताचे थेंब, 
भगवा ज्यांनी रोविला
षंढ नेत्यांनीच त्यासी 
'उपरेपणा' दाविला - || ६ ||  

ज्ञानेशाचे कर्म सारे, 
हो मिळाले मातीला
अब्ज-कोटीही  न पुरले 
ह्या पुढारी जातीला - || ७ || 

खिन्न झालो, सुन्न झालो, 
होत होत्या यातना
'मुंबई' अखेरीस झाली 
पश्चिमेची 'पाटणा' - || ८ ||

- अक्षय अशोक अणावकर 

No comments: