ती अमावसेची रात माल आठवते
रस्त्यवर कोणी चिटपाखरू ही नव्हते...
गडगडाट होता मेघांचा अवकाशी
अन वीज लखाके भेदून त्या तीमिराशी...
जरी ओळखीची ती होती पाउलवाट
तरी मनात होते भीतीचे सावट...
धडधडे ह्रदय अन थिजून गेली वाचा
तरी मनात होतो करीत जप रामाचा...
अन एक अचानक वीज अशी चमचमली
मज ओले ती सुंदरी अवचित दिसली...
थंडीने थरथर कापत होती काया
असहाय्य होवुनी निघे जवळ यावया...
कर करांत गुंफून जवळ तिला घेतले
आधारांवर अलगद आधार तिचे टेकले...
बर्फा सम होता थंडगार निश्वास
अन शारीर अवघे जणू शीलेचा भास...
अन एक अचानक वीज अशी लखलखली
नव्हती ती तरुणी एक हडळ मज दिसली...
माने भोवती करपाश तिने करकचला
अन कळले मजला यम दाराशी आला...
ओठांतून फुटली आर्त एक खिंकाली
ऐकून घरातून बायको धावत आली...
गदगदा हलवूनी केले मजला जागे
अन कळले मजला स्वप्नची उरले मागे...
<माझे बाबा - श्री. अशोक अणावकर ह्यांनी लिहिलेली एक कविता...>
No comments:
Post a Comment